About us
About us
माझ्या स्वाध्याय नोट्स डॉट कॉम वेबसाईट विषयी
कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर सरावा अतिशय महत्त्वाचा असतो. आज-काल विद्यार्थ्यांना अभ्यासाविषयी गोडी राहिलेली नाही. बरीच मुले इंटरनेट मोबाईल यामध्ये व्यस्त असतात अशा विद्यार्थ्यांना व्यस्त ठेवण्यासाठी आणि अभ्यासाची आवड निर्माण होण्यासाठी त्यांच्याकडून सराव करून घेणे अतिशय गरजेचे असते.
आम्ही आमच्या या वेबसाईटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी कशी करावी यासंदर्भात वेगवेगळ्या टेस्ट देणार आहोत आणि त्या टेस्ट कशा सोडवायच्या याची उत्तरे देखील पुरवणार आहोत. त्यात काय तर अभ्यासाविषयी आवड निर्माण करण्यासाठी आम्ही आमच्या वेबसाईटच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. थोडक्यात शैक्षणिक क्षेत्रातील माहिती आम्ही आमच्या या संकेतस्थळावर देणारा असून भविष्यामध्ये नोकरीच्या ज्या संधी आहेत त्या कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आहेत त्याविषयी देखील माहिती अध्यायावत करणार आहोत. असा मी फक्त वेगवेगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना पुरवण्याच्या दृष्टिकोनातून हे संकेतस्थळ प्रश्नपत्रिकांना वाहिलेले संकेतस्थळ अशी याची ओळख असणार आहे.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील आम्ही या आमच्या संकेतस्थळावर सराव पेपर देणार आहोत यातून विद्यार्थ्यांचा सराव होईल आणि ते परीक्षेला सामोरे जातील.
माझ्याविषयी
मी प्रशांत श्रीरंग शिपकुले माझे शिक्षण एम.ए.एम. एड.तसेच सेट नेट असून मला अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये 14 वर्षांचा अनुभव आहे.मी एक माध्यमिक शिक्षक आहे. स्वतः शिक्षण क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी कशी लावायची याबाबत बऱ्यापैकी मला माहिती आहे.इतर शिक्षक मित्र देखील सोबत काम करणार आहेत.
माझ्या या स्वाध्याय नोट्स वेबसाईट बरोबरच dnyanyogi.com आणि MarathiSelfstudy.com या इतर देखील दोन वेबसाईट आहेत. या वेबसाईटच्या माध्यमातून मी शिक्षण क्षेत्रातील तसेच विविध सण उत्सव यांची माहिती प्रसारित करत असतो.
परंतु मुलांना अभ्यासामध्ये आवड निर्माण व्हावी या प्रेरणेतून मी हे संकेतस्थळ सुरू करीत आहे.
प्रशांत शिपकुले एम.ए. एम.एड. |
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा