प्रथम घटक चाचणी pdf 2022 भूगोल 10 th मराठी medium | मराठी माध्यम भूगोल 2022
प्रथम घटक चाचणी pdf 2022 भूगोल 10 th मराठी medium | मराठी माध्यम भूगोल 2022
प्रथम घटक चाचणी
इयत्ता :- १० वी विषय :- भूगोल गुण :- २०
.................................................................................................................................................
प्रश्न १. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य तो पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (४)
(१) भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक ...................................नावाने ओळखले जाते.
(अ) लक्षद्वीप (ब) कन्याकुमारी (क) पोर्टब्लेयर (ड) इंदिरा पॅाइंट
(२) ‘जगाचा कॉफी पॅाट’ म्हणून .............................या देशाला ओळखले जाते.
(अ) भारत (ब) ब्राझील (क) चीन (ड) जपान
(३) अॅमेझॅान नदीचे खोरे मुख्यता ................................
(अ) अवर्षण ग्रस्त आहे (ब) दलदलीचे आहेत
(क) मानवी वस्तीस प्रतिकूल आहे (ड) सुपीक आहे
(४) अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही ............................................
(अ) मुख्य भागापासून तुटलेल्या भू-भागांची बनलेली आहे (ब) प्रवाळ बेटे आहे
(क) ज्वालामुखीय बेटे आहे (ड) खंडीय बेटे आहे
प्रश्न २. योग्य जोड्या जुळवा. (४)
‘अ’ स्तंभ ‘ब’ स्तंभ
(१) फुटबॉल (अ) ब्राझील मधील प्रसिद्ध नृत्यप्रकार
(२) सांभा (ब) ब्राझील शेजारील देश
(३) नवी दिल्ली (क) ब्राझीलमधील सुप्रसिद्ध खेळ
(४) उरुग्वे (ड) भारतातील प्रसिद्ध नृत्यप्रकार
(ई) भारताची राजधानी
प्रश्न ३. एका वाक्यात उत्तरे लिहा . ( कोणतेही चार ) (४)
(१) भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे?
(२) भारताशेजारील कोणतेही तीन देशांची नावे सांगा?
(३) ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर कोणते?
(४) भारतातील कोणत्या किनारपट्टीवर त्रिभुज प्रदेश आढळतात?
(५) क्षेत्रभेट म्हणजे काय?
प्रश्न ४. फरक स्पष्ट करा. (२)
(१) भारताची पश्चिम किनारपट्टी व भारताची पूर्व किनारपट्टी.
प्रश्न २ थोडक्यात उत्तरे लिहा. (कोणतेही दोन ) (६)
(१) कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा?
(२) स्वातंत्र्योतर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले?
(३) भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यसाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातजात आहेत?
उत्तर पत्रिका आहे का?
उत्तर द्याहटवा