इयत्ता 9 वी मराठी प्रथम भाषा प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका 2022 | class 9th first unit test 2022 marathi
इयत्ता 9 वी मराठी प्रथम भाषा प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका 2022 | class 9th first unit test 2022 marathi
इयत्ता नववी प्रथम घटक चाचणी 2022 विषय मराठी |
प्रथम घटक चाचणी 2022 मराठी
इ .९ वी विषय : मराठी गुण : 20
प्रश्न 1. पुढील उतारा अजून दिलेल्या सूचनानुसार कृती करा.
१ . आकलन
अनुताईकडे कोणत्या दोन गोष्टी होत्या.
1) 【 】 2) 【 】
रानावनात भटकणाऱ्या आदिवासींना व्यवहारिक शिक्षण देणार तसं खूप सोपं ;पण जाणीवपूर्वक आणि आयुष्यात उपयुक्त ठरणारं औपचारिक शिक्षण देणं खूप अवघड. त्यासाठी आवश्यक असते भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी आणि धडपड. या दोन्हीही गोष्टी अनुताईंकडे होत्या. त्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रयोग करताना कसलीच अडचण भासली नाही, की पाश्चिमात्यांचा अभ्यासक्रम भाषांतरित करावा लागला नाही . प्राथमिक शिक्षण म्हणजे एकूणच शिक्षणाचा आणि आयुष्याचा भक्कम पाया असावा लागतो . याचं भान त्या कधीच विसरल्या नाहीत.
2 ) आकलन
औपचारिक शिक्षण देण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात . 【 】
【 】
3 ) स्वमत
शिक्षणाचे महत्त्व यावर तुमचे विचार पाच-सहा ओळीत लिहा.
प्रश्न 2. पुढील कविता वाचून दिलेल्या कृती पूर्ण करा .
१) आकलन
1) पंढरीचा चोर कोण आहे 【 】
2) कोणाच्या पायात घातली 【 】
धरीला पंढरीचा चोर |
गळा बांधोनिया दोर | १ |
हृदयबंदी खाना केला |
आत विठ्ठल कोंडीला | २ |
शब्द केली जवाजुडी |
विठ्ठल पायी घातली बेडी | ३ |
२ ) आकलन
1) विठ्ठलाच्या गळ्यात काय बांधले आहे 【 】
2) कशाचा बंदीखाना केला आहे. 【 】
प्रश्न 3 खालीलपैकी कोणतेही एक कृती लिहा
1 ) तुमच्या शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त सजावटीचे साहित्य आवश्यक आहे . त्यासाठी मागणी करणारे पत्र लिहा.
2 ) तुमच्या शाळेत 'स्वातंत्र्य दिन ' साजरा झाला यावर बातमी तयार करा .
प्रश्न 4 व्याकरण
1) पुढील समानार्थी शब्दाचा अर्थ लिहा .
फूल
2 ) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा .
देवाचे अस्तित्व मानणारा
3 ) पुढील पारिभाषिक शब्दाचा मराठीत अर्थ लिहा .
Tax
4) पुढील विरामचिन्हांच्या जोड्या लावा.
अ गट ब गट
1 उद्गारवाचक चिन्ह क ) 【 ? 】
2 प्रश्नचिन्ह ख ) 【 - 】
ग ) 【 ! 】
अशा पद्धतीने इयता 9 वी मराठी प्रथम भाषा प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका 2022 नीट मन लाऊन सोडवा, या प्रश्नपत्रिकेची आदर्श उत्तरपत्रिका लवकरच आम्ही आमच्या या वेबसाइट वर टाकणार आहोत तरी आवश्य भेट द्या. चला पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह . धन्यवाद !
🎯 हे पण वाचा -
🆕 इ 10 वी प्रथम घटक चाचणी इतिहास pdf 2022
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा